बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री निया शर्मा हिने प्रतिक्रिया दिली आहे. “काही मंडळी केवळ चर्चेत राहण्यासाठी सुशांतच्या नावाचा गैरवापर करतायत असं मत नियाने व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…

निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. सध्या ती ‘ट्विस्टेड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने आज तकला दिलेल्या मुलाखतीत नियाने सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. “काही मंडळी केवळ चर्चेत राहण्यासाठी सुशांतच्या नावाचा गैरवापर करतायत. ज्या मंडळींचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही ते लोक बेडरुममध्ये बसून ट्विटरगीरी करतायत. सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सत्य लवकरच समोर येईल. परंतु तो पर्यंत अर्धवट माहितीच्या आधारावर उगाचच कोणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी देखील शांतच राहणं पसंत करतेय. कारण मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय.” अशी प्रतिक्रिया निया शर्माने दिली.

अवश्य पाहा – “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप

रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.