News Flash

प्रियांका आधी निक जोनास करत होता ‘या’ अभिनेत्रींना डेट

चॅट शो दरम्यान निकने या अभिनेत्रींची नावे घेतली आहेत

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती, विदेशी बाबू निक जोनासचा आज १६ सप्टेंबर रोजी २७वा वाढदिवस आहे. निक मोठ्या थाटामाटामध्ये तो साजरा करणार आहे. प्रियांका आणि निकचे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये झाले. प्रियांकाला भेटण्याआधी निकने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या अभिनेत्रींना डेट केले होते. एका चॅट शो दरम्यान निकने याचा खुलासा केला आहे.

निक जोनालने २०१३ मध्ये एका चॅट शो दरम्यान त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींना डेट करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यात ३५ वर्षीय महिला सर्वात मोठी असल्याचा खुलासा निकने केला.

निकने ५५ वर्षीय अभिनेत्री डेमी मूर्सला डेट केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक आणि डेमीची ओळख डेमीची मुलगी रुमर मिल्समुळे झाली होती. तसेच ३३ वर्षीय ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेल्टा गुडरेम आणि ३८ वर्षीय केट हड्सनलादेखील निकने डेट केले होते. केट निकपेक्षा वयाने १३ वर्षांनी मोठी होती.

निकने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या प्रियांकाशी लग्न केले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निकचे वय २६ वर्षे आहे. निकने प्रियांकाला सर्वात पहिले ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान पाहिले होते. त्यानंतर निकने प्रियांकाचा सीरिजमधील को-स्टार ग्राहम रॉजर्सला प्रियांकाबाबत मेसेज केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये निकने प्रियांकाला सोशल मीडियाद्वारे मेसेज केला. त्यानंतर प्रियांका आणि निकने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. तीन वर्ष एकमेकांना डेट करुन अखेर डिसेंबर २०१८ मध्ये प्रियांका आणि निक विवाह बंधनात अडकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 10:43 am

Web Title: nick jonas dating this actress nick jonas birthday special avb 95
Next Stories
1 रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप
2 कुख्यात डाकू, संजय दत्त आणि अपहरण…असा घडला होता थरार
3 जाणून घ्या, ‘देसी गर्ल’चा पती निक जोनासविषयी..
Just Now!
X