बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती, हॉलिवूड गायक निक जोनसने त्याच्या आवडत्या दोन बॉलिवूड गाण्यांचा खुलासा केला आहे आणि त्यातील एक गाण हे प्रियांकाचे आहे. नुकताच निकने इन्स्टाग्राम खात्यावरुन त्याच्या चाहत्यांची संवाद साधला. दरम्यान एका चाहतीने निकला त्याच्या बॉलिवूडमधील आवडत्या गाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर निकने दोन मिनिटे विचार केला आणि उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकताच चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे.

निकने दोस्ताना चित्रपटातील ‘देसी गर्ल’ आणि ‘सोनु की टिटू की स्वीटी’ या चित्रटातील ‘बम दिग्गी दिग्गी बम बम’ ही दोन गाणी आवडत असल्याचे सांगितले. देसी गर्लचे हे गाणे गायक विशाल आणि शेखर यांनी संगितबद्ध केले आहे तर शंकर महादेवन, सुनिधी चौहान आणि विशाल दादलानी यांनी गायले असून कुमार यांनी लिहिले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच तुफान गाजले होते. या गाण्याला यूट्यूबवर जवळजवळ २ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. ‘बम दिग्गी दिग्गी बम बम’ हे गाणं देखील प्रचंड हिट झाले होते. या गाण्याला चाहत्यांनी तर अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.

https://www.instagram.com/p/ByYCTTwBflp/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही दिवसांपूर्वीच जोनास ब्रडर्सचे ‘सकर’ आणि ‘कूल’ हे दोन अल्बम प्रदर्शित झाले आहेत. त्यांचे हे दोन्ही म्यूजिक अल्बम प्रचंड हीट झाले. ‘सकर’ या अल्बममध्ये प्रियांका चोप्रा आणि सोफी टर्नर या दोन्ही जोनास सुना पाहायला मिळाल्या आहेत. प्रियांकाचा हा हटके अंदाज पाहाता चाहते फिदा झाले आहेत.