News Flash

निक जोनासने स्वत:ची तुलना केली या बॉलिवूड अभिनेत्यासह

निकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती विलायती बाबू, निक जोनासने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निकने त्याची तुलना एका बॉलिवूड अभिनेत्यासह केली आहे. निकने शेअर केलेले हे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये निकने त्याचा आणि बॉलिवूड अभिनेता गोंविदाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निकने गोविंदासारखे कपडे परिधान केले आहेत. दरम्यान निकने हा फोटो शेअर करत ‘अॅक्यूरेट’ असे देखील म्हटले आहे. निकचा हा फोटो पाहता निक गोविंदाची स्टाईल कॉपी करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो ओनली ह्यूमन व्हिडीओने तयार केला आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने डिसेंबर २०१८मध्ये लग्न बंधनात अडकले. जोधपुरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये लग्नसोहळा पार पडला. त्याआधी भारतीय पद्धतीने मेहंदी, संगीत, हळद असे विधी पार पडले होते. पण त्याचबरोबर ख्रिश्चनपद्धतीनेही विवाहसोहळा पार पडला होता. निक आणि प्रियांच्या लग्नाच्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

नुकाताच प्रियांकाने तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत मियामीमध्ये साजरा केला होता. दरम्यान तेथे सिगार ओढल्यामुळे नेटकऱ्यांनी प्रियांकावर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 8:52 am

Web Title: nick jonas share memes which compare him with bollywood actor avb 95
Next Stories
1 रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच १० वर्षांनंतर परतली मुलगी
2 Video : ‘टिप टिप बरसा पानी,’ गाण्यावर रवीनासोबत थिरकला प्रभास
3 बिग बॉसनंतर शिवानी सुर्वे दिसणार ‘या’ चित्रपटांमध्ये
Just Now!
X