News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचं मराठीत पोस्टर नाही

मुंबईत पोस्टरचं अनावरण करण्यात आलं, मात्र तरीही यात मराठी भाषेतील पोस्टरचा समावेश नव्हता

ओमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या महिन्यातच 'पीएम नरेंद्र मोदी' च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. मात्र पोस्टर प्रदशर्नावेळी व्यासपीठामागे लावण्यात आलेल्या पाच पोस्टरमध्ये मराठी भाषेतील पोस्टरचा समावेश नव्हता.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. एखाद्या पंतप्रधानांची कारकीर्द सुरू असताना त्यांच्यावर चित्रपट बनणे हा इतिहासही या चित्रपटाने रचला आहे. मात्र, पोस्टर प्रदशर्नावेळी व्यासपीठामागे लावण्यात आलेल्या पाच पोस्टरमध्ये गुजराती, हिंदूी, इंग्रजी, उर्दू, तमिळ या भाषांना स्थान देण्यात आले होते. मुंबईत हा सोहळा पार पडला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित होऊनही मराठीला स्थान देण्यात आले नव्हते ही दुर्दैवची बाब म्हणावी लागेल.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. ओमांग कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’, ‘भूमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे तर जुलै- ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 12:15 pm

Web Title: no marathi poster during pm narendra modi biopic launch
Next Stories
1 Photos: ‘भाईसाहब, ये किस लाइन मै आ गए आप’, पेटी वाजवणारा इमरान ट्रोल
2 ‘गुलाब जामुन’मधून ऐश्वर्या- अभिषेक बाहेर?
3 राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान
Just Now!
X