News Flash

नोरा फतेहीचा नवा अल्बम प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे.

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. आता नोराचा नवा अल्बम लाँच झाला आहे. या अल्बमध्ये ती गुरु रंधावासोबत दिसत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या नोरा आणि गुरु रंधावाच्या अल्बमचे नाव ‘नाच मेरी रानी’ असे आहे. या अल्बममध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. तसेच नोरा आणि गुरु रंधावा यांची केमिस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

‘नाच मेरी रानी’ हा अल्बम प्रदर्शित होताच यूट्यूबवर सहा लाख लोकांनी लाईक केला असून ४९ लाख लोकांनी पाहिला आहे. या गाण्यातील नोराचा डान्स मूव्ह पाहण्यासारख्या आहेत. तिने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिने या अल्बममध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

‘दिलबर दिलबर’ गाण्यापूर्वी नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे गाणे जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटामधील आहे. ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या. दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना देखील दिसली होती. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:59 pm

Web Title: nora fatehi and guru randhawa video song naach meri rani out avb 95
Next Stories
1 ‘एक कॉल घरात मॉल’
2 रिंकू राजगुरू लंडनला झाली ‘छूमंतर’
3 Review: ‘हर्षद का राज मा, तो मार्केट मजा मा’, ‘स्कॅम १९९२’ नक्की पाहावी अशी वेब सीरिज
Just Now!
X