28 February 2021

News Flash

या परदेशी अभिनेत्रीचा ‘स्वैग से स्वागत’ व्हिडिओ वायरल

गाण्याला अरेबिक टच देत त्यावर बेली डान्स केला आहे

नोरा फतेही

‘टायगर जिंदा है’मधील ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणे यंदाच्या हिट गाण्यांपैकी एक आहे. तरुणांच्या तोंडी अनेकदा हे गाणे ऐकू येते. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन आणि कतरिनाच्या मादक अदा यांमुळे हे गाणे अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. अनेकजण केवळ कतरिनाच्या डान्ससाठीच गाण्याचा व्हिडिओ वारंवार पाहतात. पण मॉडेल- अभिनेत्री नोरा फतेहीने ‘स्वॅग से स्वागत’वर बेली डान्स केला आहे. तिचा हा डान्स पाहून अनेकांना ती कतरिनापेक्षा उजवी वाटली. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये नोराच्या या व्हिडिओचा समावेश आहे.

या व्हिडिओची खासियत म्हणजे, कतरिनाच्या व्हिडिओपेक्षा नोराच्या व्हिडिओला प्रेक्षकांनी अधिक पसंत केले आहे. तिने ‘स्वॅग से स्वागत’ गाण्याला अरेबिक टच देत त्यावर बेली डान्स केला आहे. नोराच्या या व्हिडिओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
नोराने हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर शेअर केला होता. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा फतेही फारच सुंदर दिसते. तिने प्रभासच्या ‘बाहुबली- द बिगिनिंग’ या सिनेमात एक आयटम साँग केले होते. लवकरच ती संजय सुरीच्या माय बर्थडे सिनेमातही एक आयटम नंबर करताना दिसणार आहे.

या सिनेमाची आतापर्यंत जेवढी चर्चा झाली त्याचे मुख्य कारण कतरिनाच राहिली आहे. तिचा या सिनेमातील लूक पाहण्यासाठीच चाहते फार उत्सुक होते. तिने प्रेक्षकांच्या अपेक्षा फोल ठरवल्या नाहीत असेच म्हणावे लागेल. कारण या गाण्यातील कतरिनाच्या मादक अदांवर लाखो चाहते फिदा झाले यात काही शंका नाही. खूप वर्षांनी सलमानला अशा धाटणीच्या गाण्यावर नाचताना पाहून तुमचेही पाय थिरकायला लागतील यात काही शंका नाही. विशाल ददलानी आणि नेहा भसीन यांनी हे गाणे गायले असून विशाल-शेखरने या गाण्याला संगीत दिले आहे. इरशाद कामिलने गाण्याचे बोल लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 5:36 pm

Web Title: nora fatehi arabic fusion of swag se swagat viral beats katrina kaif tiger zinda hai
Next Stories
1 अशा प्रकारे केले जाणार ‘आरके’च्या चित्रपटांचे जतन
2 मित्र-मैत्रिणींसोबत गाणं गाणाऱ्या सारा अली खानचा व्हिडिओ व्हायरल
3 लहानपणी अशी दिसायची दीपिका पदुकोण
Just Now!
X