आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. नोराचे लाखो चाहते आहेत. पण इथपर्यंतचा प्रवास हा नोरासाठी सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोराने भारतात आल्यावर तिच्यासोबत काय झाले ते सांगितले आहे.

‘एबीटॉक्स’ या युट्युब चॅनलल्या दिलेल्या मुलाखतीत नोराने तिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगितले आहे. मुलाखती दरम्यान, नोरा कोण आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. “एक अभिनेत्री, परफॉर्मर आणि एक आर्टिस्ट म्हणून मी स्वत: कडे बघत नाही.” असं नोरा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

कॅनडातून भारतात आल्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर नोराला लोकप्रियता मिळाली. तो काळ तिच्यासाठी कठीण होता असं नोराने सांगितले. “भारतात येण्यासाठी मी खूप उत्सुक होती. कारण भारत सगळ्या प्रकारच्या कलांना वाव मिळतो. त्यामुळे कोणत्याही कलाकाराला पुढे येण्यास मदत होते. परंतू, भारतात आल्यावर मला सगळ्यात मोठा धक्का बसला. मी भारतात लहानाची मोठी झाली नव्हती, म्हणून मला इथल्या परंपरा, भाषा या बद्दल काही माहित नव्हते. हिंदी भाषा शिकायला मला खूप वेळ लागला.”

तुला लोकप्रियता आवडते का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर नोरा म्हणाली, “मला मिळालेली लोकप्रियता मला खूप आवडते. मला सगळ्या लोकांना दाखवून द्यायचे आहे की एक डान्सरसुद्धा यशस्वी होऊ शकते. परंतू हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा कठोर परिश्रम करण्यासाठी तुम्ही तयार असता. मला बॉलिवूडमध्ये इतिहास घडवायचा आहे.”

काही दिवसांपूर्वी नोराचा ‘छोड देंगे’ हा म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. यातील नोराच्या लूक आणि डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्याला ११ कोटी व्ह्यूज होते.