22 February 2019

News Flash

‘Once मोअर’च्या प्रदर्शनाच्या तारखेत झाला बदल

जॉन अब्राहम निर्मित ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ हे दोन्ही चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार होते.

आज मराठी चित्रपटांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात एकाहून अधिक चित्रपट प्रदर्शित होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र एकाच दिवशी दोन किंवा त्याहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम चित्रपटांच्या कमाईवर होत असतो. तरीदेखील या समस्येवर तोडगा निघत नव्हता. मात्र ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ च्या निर्मात्यांनी या क्लॅशवर तोडगा काढल्याचं पाहायला मिळतंय.

जॉन अब्राहम निर्मित ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ हे दोन्ही चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार होते. मात्र या चित्रपटांचा होणारा क्लॅश टाळण्यासाठी या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी संगनमत करुन ‘Once मोअर’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता ‘Once मोअर’ हा चित्रपट ३१ ऑगस्टऐवजी १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केली असून ‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ अंतर्गत त्याची प्रस्तुती होणार आहे. तर नरेश बीडकर यांनी ‘Once मोअर’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली असून हा चित्रपट वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसंच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म या निर्मिती संस्थांतर्गत होणार आहे.

 

First Published on July 12, 2018 1:13 pm

Web Title: once more marathi movie released date