News Flash

शाहिद- मिशाचा हा फोटो होतोय व्हायरल

शाहिद अनेकदा आपल्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो

शाहिद आणि मिशा कपूर

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमात राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो मुलगी मिशासोबत मजा- मस्ती करताना दिसत आहे. या फोटोला काही तासांमध्येच ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. फोटोत शाहिद आणि मिशा दोघंही फार क्यूट स्माइल देताना दिसत आहेत. मिशाने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे टी- शर्ट घातले आहे. या टी- शर्टवर छोटेसे हार्टही आहे. शाहिद दोघांचा हा फोटो शेअर करताना हॅपी संडे असे छोटेसे कॅप्शनही दिले. शाहिदच्या हा फोटो त्याच्या चाहत्यांना फार आवडला, त्यांनीही अनेक चांगल्या कमेंट या फोटोला दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाहिदने मिशा त्याचे शूज घालतानाचा फोटो शेअर केला होता. मिशाचे सारेच फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

शाहिद अनेकदा आपल्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. २६ ऑगस्ट २०१६ ला मीशाचा जन्म झाला. शाहिदने मीशाचा पहिला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. प्रसारमाध्यमांपासून दूर राहत शाहिदने मीशाचा वाढदिवस शांततेत लंडनमध्ये साजरा केला होता. अनेक कलाकारांच्या मुलांप्रमाणेच मीशाही कॅमेऱ्या फ्रेण्डली आहे. आपल्या आई-बाबांप्रमाणेच ती छायाचित्रकारांना खुलून फोटो काढू देताना दिसते. काही दिवसांपूर्वी शाहिदने मीशा फुटबॉल खेळतानाचा फोटो शेअर केला होता. मीशा आणि शाहिदचा हा फोटो अगदी थोड्या वेळातच व्हायरल झाला होता. त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, ‘छोट्या मिसीसोबत खेळतोय.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 4:55 pm

Web Title: padmaavat star shahid kapoor daughter meesha kapoor picture getting viral on internet
Next Stories
1 IPL 2018: आयपीएल लिलावात महिला क्रिकेटपटू का नाही: ऋषी कपूर
2 Video: डान्स करताना स्टेजवर पडली ही टीव्ही अभिनेत्री
3 दीपिकाच्या न होऊ शकलेल्या सासु- सासऱ्यांनी तिला दिले खास गिफ्ट
Just Now!
X