News Flash

कान चित्रपट महोत्सव : तीन दशकांत प्रथमच दिग्दर्शिकेस पाम पुरस्कार

फ्रेंच दिग्दर्शिका ज्युलिया डय़ूकॉरन्यू  यांचा २०१६ मध्ये ‘रॉ’ नावाचा चित्रपट आला होता

ज्युलिया डय़ूकॉरन्यू

नवी दिल्ली : कान चित्रपट महोत्सवात प्रथमच तितान या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी फ्रेंच दिग्दर्शिका ज्युलिया डय़ूकॉरन्यू यांना पाम डीओर पुरस्कार मिळाला आहे. त्या ३७ वर्षांच्या आहेत. गेल्या २८ वर्षांत महिला दिग्दर्शकास पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे.

७४ व्या कान चित्रपट महोत्सवात स्पाइक ली यांनी परीक्षक म्हणून काम केले. त्यांनी चुकून पहिल्यांदाच ज्युलिया यांचे नाव जाहीर करून रहस्योद्घाटन केले. त्यामुळे चुकून त्यांच्याकडून उत्कंठाच संपवण्याचा प्रकार घडला कारण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा शेवटी जाहीर करणे अपेक्षित होते पण त्यांनी तो आधीच जाहीर केला.

परीक्षक मंडळात माटी डियॉप, मायलीन फार्मर, मॅगी गायलेनहाल, जेसिका हॉसनर, मेलनी लारेंट, क्लेबर मेंडोन्का फिलो, तहार रहीम व साँग काँग हो यांचा समावेश होता.

फ्रेंच दिग्दर्शिका ज्युलिया डय़ूकॉरन्यू  यांचा २०१६ मध्ये ‘रॉ’ नावाचा चित्रपट आला होता. तो आंतरराष्ट्रीय समीक्षण गटात होता. कान चित्रपट महोत्सवातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक आहेत. न्यूझीलंडच्या जेन चॅम्पियन यांना पहिला पाम डीओर पुरस्कार ‘दी पियानो’ या चित्रपटासाठी १९९३ मध्ये मिळाला होता.

ग्रँड प्रिक्समध्ये इराणच्या असगर फरहदी यांचा ‘अ हीरो’ व फिनलंडचे दिग्दर्शक जुहो क्युओसमॅनेन यांचा ‘कंपार्टमेंट नं. ६’ या चित्रपटांनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.  मॅरियन कोटिलार्ड व अ‍ॅडम ड्रायव्हर अभिनित हा चित्रपट ६ जुलै रोजी दाखवण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाचे दिग्दर्शक जस्टीन कुझ्रेल यांच्या  चित्रपटातील भूमिकेसाठी कॅलेब लँड्री यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नॉर्वेच्या  रिनेट रेनव्ही हिला जोआकिम ट्रायर यांच्या ‘द वर्स्ट पर्सोना इन दी वर्ल्ड’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 12:41 am

Web Title: palme dor julia ducournaus titane wins top prize at cannes zws 70
Next Stories
1 विक्की कौशलच्या या व्हिडीओवर दीपिका पादुकोणसह इतर सेलिब्रिटींना हसू आवरलं नाही
2 तमिळ अभिनेता सिद्धार्थला मृत घोषित केलं; तक्रार केल्यानंतर यूट्यूबने दिलं ‘हे’ विचित्र उत्तर
3 Video: शूटिंगमध्ये इतकं एन्जॉय करत होते राजेश खन्ना; ट्विंकल खन्नाने वडिलांच्या आठवणीत शेअर केला एक व्हिडीओ
Just Now!
X