News Flash

‘जेम्स बॉंन्ड’च्या मुलीचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू

हेरगिरीचा बादशाह 'जेम्स बॉंन्ड' ची भूमिका साकारलेला हॉलिवूड अभिनेता पीअर्स ब्रॉसननची मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. याच आजाराने बावीस वर्षापूर्वी तिची आई

| July 2, 2013 02:09 am

हेरगिरीचा बादशाह ‘जेम्स बॉंन्ड’ ची भूमिका साकारलेला हॉलिवूड अभिनेता पीअर्स ब्रॉसननची मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. याच आजाराने बावीस वर्षापूर्वी तिची आई कॅसेन्ड्रा हॅरीस हिचादेखिल मृत्यू झाला होता.
वयाच्या ४१ व्या वर्षी लंडन येथे २८ जून रोजी शार्लटची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त ‘अेस शोबीझ’ने दिले आहे. ‘२८ जून रोजी माझी प्रिय मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने दुर्देवी अंत झाला, असे ब्रॉसननने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.  
तिच्या मृत्यूच्या वेळी तिचा पती अॅलेक्स, मुलं इसाबेला आणि लुकास व भाऊ ख्रिस्तोफर आणि सीन जवळ होते.
शार्लटने मोठ्या हिमतीने आणि शांत व समजूतदार वृत्तीने आजाराशी शेवटपर्यंत लढा दिला. अतिशय जड अंत:करणाने आम्ही आमच्या सुंदर मुलीला निरोप देत आहोत. या आजारावर लवकरावर निदान उपलब्ध व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आम्ही आभार मानतो, असं ब्रॉसनन म्हणाले.   
शार्लट आणि ख्रिस्तोफर हि हॅरीस यांच्या पहिल्या लग्नानंतर झालेली अपत्य आहेत. १९८० मध्ये हॅरीस आणि ब्रॉसनन यांच्या विवाहानंतर ते एकत्र राहत होते. पुढे आपल्या जैविक पित्याचा मृत्यू झाल्यानंतर ब्रॉसनन यांनी त्यांना दतत्क घेतले. हॅरीस आणि ब्रॉसनन यांना सीन नावाचा मुलगा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:09 am

Web Title: pierce brosnan loses daughter charlotte to ovarian cancer
Next Stories
1 ‘जादू की झप्पी’ गाणे संजय दत्तशी जोडलेले – जॅकलीन
2 पुढील तीन वर्षात गोव्यात येणार फिल्मसिटीः गोवा राज्य सरकार
3 ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत
Just Now!
X