गेल्या वर्षभरात कॉमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यात काही गोष्टी झपाट्यानं बदलल्या आहेत. एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा विनोदवीर सध्या वादाच्या आणि नैराश्येच्या गर्तेत सापडला आहे. कपिलच्या जवळ असलेला आणि अशाही परिस्थितीत त्याची साथ न सोडलेला त्याचा सहकलाकार किक्कू शारदा त्याच्या मदतीला धावून आला आहे. कपिलवर आरोप करण्यापेक्षा त्याला आता सगळ्यांनीच काही काळासाठी एकटं सोडा अशी विनंती त्यानं केली आहे.

वाचा : ‘कोणत्याही क्षणी कपिल आत्महत्या करु शकतो’, एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

‘कपिल हा एक सर्जनशील आणि सर्वोत्तम व्यक्ती आहे. सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे तो तणावात आहे. जे काही त्याच्यासोबत घडत आहे ते नक्कीच चुकीचं आहे. आज त्याच्याविरोधात बोलणाऱ्या व्यक्ती या त्याच आहेत ज्यांना कपिलनं कोणेकाळी प्रेक्षकांसमोर येण्याची संधी दिली होती. कपिलनं देशभरातील लोकांना खळखळून हसवलं आहे हे कोणीही विसरता कामा नये. पण सध्याची परिस्थिती पाहता त्याला एकटं सोडलं पाहिजे अशी विनंती किक्कूनं केली आहे.

वाचा : ब्रेकअपनंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा; कपिलच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

गेल्यावर्षी विमानात झालेल्या वादानं कपिलच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याच्या अनेक सहकलाकारानं त्याच्या अशा वागण्यामुळे त्याची साथ सोडली. पण किक्कू मात्र त्याच्यासोबतच राहिला. मी १५ वर्षांपासून विनोदी भूमिका साकारत आहे. काही गोष्टी मी कपिलकडून शिकल्या आहेत हे सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही, असंही तो म्हणाला. कपिलच्या चुकीच्या वागण्याचं मी कधीही समर्थन करत नाही किंवा करणार नाही, पण सध्याची परिस्थिती आणि कपिलची तब्येत पाहता त्याला दोष देणं चुकीचं आहे असं मत त्यानं मांडलं आहे.

वाचा : अखेर कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’