एखादी भावना किंवा मनातल्या बऱ्याच गोष्टी व्यक्त करण्यासाठी जी तंत्र अवलंबली जातात त्यातीलच एक तंत्र म्हणजे काव्य. कविता हे एक असं प्रभावी माध्यम आहे, ज्याच्याद्वारे अतिशय मोजक्या शब्दांणमध्ये आणि तितक्याच प्रभावीपणे आपल्या मनीचे भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं शक्य होतं. ज्येष्ट गीतकार जावेद अख्तर यांनी असंच एक काव्य सादर केलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुळात जावेद अख्तर यांनी काव्यवाचन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण, रेख्ता या ट्विटवर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या प्रकारे काव्य सादर केलं आहे, ते पाहता तुम्हीही त्यांना काव्यात्मक अंदाजात दाद दिल्यावाचून राहणार नाही. आपल्या आजोबांच्या म्हणजेच मुझ्तार खैरबादी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘खैरमान’ या काव्याचं वाचन केलं.

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

सर्वात लांब ‘मिस्रा’ असणारं हे काव्य सादर करतेवेळीचाच एक व्हिडिओ ज्यावेळी नेटकऱ्यांच्या नजरेस आला तेव्हा त्यांनीही अख्तर यांची वाहावा केली. एका श्वासातच त्यांनी हे काव्य ज्या आत्मियतेने सादर केलं ते पाहून उपस्थितांनीही त्यांचं कौतुक केलं. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनीही अख्तर यांच्या काव्याला सुरेख प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे ब्रेथलेस काव्यवाचन आणि ‘उसे क्यूँ हमने दिया दिल’ असा प्रश्न विचारणारे अख्तर खऱ्या अर्थाने चर्चेत आहेत.