News Flash

एडनबर्गमध्ये पूजाची ‘लपाछपी’ ठरली लक्षणीय

चाकोरीबद्ध सिनेमातून बाहेर पडत मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे.

पूजा सावंत, लपाछपी

चाकोरीबद्ध सिनेमातून बाहेर पडत मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. मराठी कलाकारांनी देखील आपल्या अभिनय कौशल्यावर स्वतःला सिद्ध करत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव नोंदवले आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतच्या कामगिरीचादेखील यात आवर्जून उल्लेख करता येईल. नुकत्याच झालेल्या एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला ‘लपाछपी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याच फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनाही ‘लपाछपी’तल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला.

वाचा : दीपिकाला कपिलचा पाठिंबा

वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तुत आणि मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित या सिनेमाने यापूर्वीदेखील अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये मोलाची कामगिरी केली. जुलैमध्ये महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आपला थरार कायम राखत हॉररपटाचा नवा आयाम मराठी सिनेसृष्टीत रुजू केला.

वाचा : जॉनी लिव्हर यांना आजही या गोष्टीचे दुःख..

एडनबर्गमध्ये गाजलेल्या ‘लपाछपी’ सिनेमातील लक्षणीय भूमिकेबद्दल मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना पूजाने ‘लपाछपी’ मधील भूमिका माझ्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले. ‘आठ महिन्याच्या गरोदर बाईची भूमिका यात मला साकारायची होती. ते माझ्यासाठी एक आव्हान होत. स्वतःच्या बाळाला वाचवणाऱ्या एका आईची ही गोष्ट असून, ही भूमिका मला मिळाली याबद्दल मी दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे आभार मानते’ असे देखील ती पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:14 pm

Web Title: pooja sawants lapachhapi marathi movie catching everyones eyes in edinburgh film festival
Next Stories
1 ‘त्या’ ड्रेसच्या प्रेमात पडलीये सुहाना
2 शिल्पा शिंदेनंतर दुसरी अंगुरी भाभीसुद्धा शो सोडणार?
3 चित्रपट न पाहताच राजकीय नेते विरोध कसा करू शकतात; ‘पद्मावती’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
Just Now!
X