21 January 2021

News Flash

प्रणाली चव्हाण ठरली ‘डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल चार्ज’ची विजेती

७० किंवा त्याहून अधिक वजन असलेल्या स्पर्धकांनी घेतला होता भाग

महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो ‘डान्सिंग क्वीन’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला. ‘साईज लार्ज फुल चार्ज’ ही टॅगलाइन असणाऱ्या या डान्स शोची पहिली विजेती ठरली ती पुण्याची प्रणाली चव्हाण.

टॉप सहा जणांमध्ये अंतिम फेरी रंगली होती आणि प्रणालीने अखेर त्यात बाजी मारली. प्रणाली एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला होती. पण डान्सचं वेड तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर तिने या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर तिने विजेतेपद पटकावलं. या पर्वात अहमदनगरची स्नेहा देशमुख दुसऱ्या क्रमांकावर होती. तर मुंबईची अपूर्वा उंडाळकर तिसऱ्या क्रमांकावर होती.

या शोमध्ये १५ वर्षे व त्यावरील वयोगटाच्या मुली व महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांचं वजन ७० किंवा त्याहून अधिक असलं पाहिजे, हीच एक अट होती. नाट्यलेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. तर या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदेने केलं. मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का या शोचे परीक्षक होते.

या अंतिम फेरीचा मजेशीर भाग प्रेक्षकांना रविवार २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:30 pm

Web Title: pranali chavan became winner of dancing queen size large full charge ssv 92
Next Stories
1 “तू पुन्हा गरोदर आहेस का?”; चाहत्याच्या प्रश्नाला मीरा राजपूतने दिलं ‘हे’ उत्तर
2 धारावीत करोनाचा कहर थांबला; अजय देवगणने व्यक्त केला आनंद, म्हणाला…
3 ‘या’ व्यक्तीमुळे सलमान आजही आहे अविवाहीत?
Just Now!
X