News Flash

VIDEO : प्री वेडिंगवरही राणादा अन् अंजली बाईंचीच जादू

'चालतंय की...'

छाया सौजन्य- फेसबुक

‘चालतंय की…’ असं म्हटल्यावर हल्ली डोळयासमोर उभा राहतो तो म्हणजे राणादा. अहो, राणादा म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कोल्हापुरातील रांगड्या राणाच्या प्रेमकथेवर बेतलेल्या या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना आतापर्यंत खिळवून ठेवलं आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’च्या शीर्षकगीतापासून ते मालिकेतील प्रत्येक पात्रापर्यंत सर्वकाही सध्या ट्रेंडमध्ये आहे, असं म्हणायला हरकत नाही.

दणदणणाऱ्या डीजेपासून ते अगदी प्री वेडिंग फोटोशूटपर्यंत सगळीकडेच या मालिकेची जादू पाहायला मिळत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील शीर्षक गीतावर तयार करण्यात आलेला एक प्री वेडिंग व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. विशेष म्हणजे मालिकेचे लेखक सुबोध खानोलकर यांनी स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी मालिकेच्या शीर्षकगीताला अनोख्या पद्धतीने सादर करण्याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे.

खानोलकर यांनी शेअर केलेला प्री वेडिंगचा व्हिडिओ पाहून या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हीही लावू शकता. ‘तुझ्यात जीव रंगला’च्या शीर्षकगीताचा आधार घेत ते रिक्रिएट करण्यात आलं आहे. राणा- अंजलीऐवजी या व्हिडिओत दोन नवे चेहरे असून, त्यांनीही हार्दिक (राणा) आणि अक्षया (अंजली) प्रमाणेच अगदी हुबेहूब अभिनय केल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने टीआरपीच्या क्रमवारीतही या इतर मालिकांना मागे टाकलं आहे. मुख्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात या मालिकेचं वेड पाहायला मिळते आहे. इतकच नाही तर रांगड्या राणाचा तरुणाईवरही बराच परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचच उदाहरण गडहिंग्लजमध्ये पाहायला मिळालं होतं. गडहिंग्लज तालुक्यातील गेली १५ वर्षे बंद पडलेल्या व्यायामशाळा नव्या जोमाने सुरू झाल्यामुळे हे या मालिकेचं यशच म्हणावं लागेल.

वाचा: चित्ररंजन : तीन तऱ्हांचे तीन चित्रपट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 6:18 pm

Web Title: pre wedding shoot trend tujhyat jeev rangala marathi serial title song in kolhapur latest updates
Next Stories
1 VIDEO: रितेश देशमुखचे कप साँग पाहिले का?
2 Tubelight Trailer Watch Video : ‘ट्युबलाइट’चा सिक्वल ‘एलईडी’ असेल, सलमानची मार्मिक टिप्पणी
3 Tubelight trailer Watch Video : जाणून घ्या ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, कुठे बघता येईल?
Just Now!
X