News Flash

प्रिती झिंटाने दिल्या नववर्षाच्या शुभेच्या; व्हिडीओ व्हायरल

भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे.

भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. सेलिब्रिटी मंडळीही या सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत. त्यांनी सोशल मीडियाव्दारे आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये तिने शुभेच्छा तर दिल्याच शिवाय जी मंडळी आपल्या कुटुंबियांसोबत नाहीत त्यांना कधीही उदास न होण्याचा सल्ला देखील तिने दिला आहे.

काय म्हणाली प्रिती झिंटा?

प्रितीने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमार्फत तिने आपल्या चाहत्यांना नवीन ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. “आज प्रत्येक जण खुश नाही. कारण अनेक जण आज आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत. परंतु नाराज होऊ नका. जिद्दिने काम करा. झालेल्या चुका विसरा आणि नव्या वर्षात नव्या उमेदिने पुन्हा एकदा काम करा. सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” अशा आशयाचे ट्विट प्रिती झिंटाने केले आहे.

प्रितीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या ट्विटवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला नववर्षाच्या शुभेच्या देखील दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:19 pm

Web Title: preity zinta celebrating new year 2020 mppg 94
Next Stories
1 अभिनेत्रींनी स्वीमसूटमध्ये दिली ‘नागिन ५’साठी ऑडिशन; व्हिडीओ व्हायरल
2 विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश
3 Video: सेलिब्रिटींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, म्हणाले…
Just Now!
X