अभिनेत्री प्रिया आनंदला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. प्रिया आनंदने इंग्लिश विंग्लिशमध्ये श्रीदेवी सोबत आणि एलकेजीमध्ये जेके रितेश ह्यांच्या सोबत काम केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशा आशयाचे व्टिट करण्यात आले आहे.
प्रिया आनंदने बहुतेक मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री श्रीदेवीसोबत तीने इंग्लिश विंग्लिश या चित्रपटामध्ये काम केले होते. जे कोणी प्रीया आनंद सोबत सहकलाकार म्हणून काम करतात त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे प्रिया आनंद ही तीच्या सहकलाकारांसाठी बॅड लक आहे का अशा आशयाचे व्टिट एका व्टिटर हॅन्डलवरून करण्यात आले आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना प्रिया आनंदने म्हटले, ‘मी तुमच्यासारख्या लोकांना प्रतिसाद देत नाही. परंतु मी आपल्याला हे सांगू इच्छिते की तुझे बोलणे हे अत्यंत असंवेदनशील आहे. सोशल मिडीयावर बोलून पळणे सोपे आहे आणि तुझे हे बोलणे अत्यंत खालच्या पातळीचे आहे त्यामुळे मी तुला उत्तर देणार नाही.’

प्रीया आनंदने उत्तर दिल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांने माफी देखील मागितली आहे.