21 January 2021

News Flash

ज्यासाठी प्रियांकानं ‘भारत’ सोडला, त्याचं भविष्यच टांगणीला?

सध्या प्रियांका भारतात असून ती 'दी स्काय इज पिंक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

प्रियांका चोप्रा, priyanka chopra

प्रियांका चोप्रा ही सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली ग्लोबल स्टार झाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या बिग बजेट ‘भारत’ला रामराम ठोकत प्रियांकानं हॉलिवूड चित्रपट आपल्या पदरात पाडून घेतला. मात्र ज्या चित्रपटासाठी प्रियांकानं इतका आटापिटा केला खुद्द बॉलिवूडच्या भाईजानशी वाकडं घेतलं अशा चित्रपटाचं भविष्य संध्या टांगणीला आहे.

‘काऊबॉय निनजा वायकिंग’ या अॅक्शनपटात महत्त्वाची भूमिका प्रियांकाच्या वाट्याला आली. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता ख्रिस पॅटसोबत ती भूमिका साकारणार होती. २८ जून २०१९ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उशीर होत आहे. त्यामुळे हा चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होऊ शकत नाही. त्यामुळे ही तारीख आता मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रियांका सध्या चिंतेत आहे.

प्रियांका म्हणते, यापुढे मी तडजोड करणार नाही!

प्रियांका ‘भारत’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार होती. मात्र चित्रीकरणाला सुरूवात व्हायला १० दिवस बाकी असताना तिनं या चित्रपटासाठी नकार कळवला. तिचं वागणं अव्यवहारिक आहे असं सांगत सलमानसह चित्रपटांच्या निर्मात्यांनी देखील नाराजी दर्शवली होती. पण, ज्या चित्रपटासाठी तडकाफडकी भारत सोडण्याचा निर्णय तिनं घेतला त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यानं प्रियांका चिंतेत आहेत.

हा चित्रपट उशीरा प्रदर्शित होत असला तरी त्यात प्रियांकाच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे असं आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या प्रियांका भारतात असून ती ‘दी स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 1:44 pm

Web Title: priyanka chopra hollywood film gets delayed
Next Stories
1 ‘…तर मग बॉलिवूड चित्रपटांच्या कथानकाबाबत तक्रार करू नका’; शूजित सरकार संतापला
2 Stree song Kamariya: ‘कमरिया’मधील नोराच्या अदांनी प्रेक्षक पुन्हा घायाळ
3 निराधारांना आधार देणाऱ्या बाळूमामांचं चरित्र लवकरच छोट्या पडद्यावर
Just Now!
X