20 March 2019

News Flash

अबब! ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांकानं आकारलंय चक्क एवढ्या कोटींचं मानधन?

दीपिकानंतर सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाही आली आहे. दीपिकानं 'पद्मावत' सिनेमासाठी तब्बल १२ कोटींचं मानधन आकारलं होतं.

प्रियांका चोप्रा

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिची ओळख केवळ बॉलिवूड अभिनेत्री अशी राहिली नसून आता ती ‘ग्लोबल स्टार’ झालीय. ‘क्वांटिको’ मालिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली. तर सध्या चित्रिकरणामुळे अमेरिकेत स्थायिक असलेली प्रियांका ‘भारत’ चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पण, या चित्रपटात सलमानसोबत काम करण्यासाठी तयार झालेल्या प्रियांकानं खूपच मोठी रक्कम मानधन म्हणून मागितली आहे.

अली अब्बास जाफर यांच्या ‘भारत’ चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. यात सलमान महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. याव्यतिरिक्त दिशा पटानीही या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात काम करण्यासाठी प्रियांकानं होकार भरला आहे पण यासाठी तिनं १४ कोटींचं मानधन आकारल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांकाच्या टीमनं १४ कोटींचा आकडा दिग्दर्शकांसमोर ठेवला होता अखेर या चित्रपटासाठी १४ ऐवजी १२ कोटी रुपये मानधन देण्यास अली जाफर तयार झाले आहे.

वाचा : प्रेमप्रकरण की निव्वळ अफवा? निकसोबत डिनर डेटला गेली ‘देसी गर्ल’ प्रियांका

प्रियांका ही ग्लोबल स्टार आहे त्यामुळे तिनं एवढं मोठं मानधन आकारल्याचं मिड डेनं म्हटलं आहे. त्यामुळे दीपिकानंतर सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाही आली आहे. दीपिकानं ‘पद्मावत’ सिनेमासाठी तब्बल १२ कोटींचं मानधन आकारलं होतं. ‘प्रियांका चोप्राच या चित्रपटासाठी योग्य आहे. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील तिनं आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘भारत’साठी तिच्यापेक्षा उत्तम अभिनेत्री कोणी असूच शकत नाही असं अली अब्बास जाफर म्हणाले होते. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रियांका- सलमान ही जोडी तब्बल दहा वर्षांनी एकत्र येणार आहे. सलमानसोबत तिनं ‘मुझसे शादी करोंगी’, ‘सलाम- ए- इश्क’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटातून काम केलं होतं.

First Published on June 14, 2018 12:00 pm

Web Title: priyanka chopra is getting hefty paycheck for bharat film