बॉलिवूडमधील देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. आपल्या अभिनय कौशल्याने तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज १८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकातून प्रियांकाने व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवनातील फक्त महत्त्वाच्याच गोष्टी उलगडलेल्या नाहीत, तर आयुष्यातील काही गमतीशीर प्रसंगही वाचकांना सांगितले आहेत.

हॉलिवूड गायक निका जोनासशी लग्ना केल्यानंतर प्रियांका अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी त्यापूर्वी सुद्धा ती अमेरिकेत राहिली आहे. तिने तेथेच शिक्षण घेतले आहे. ती तिच्या नातेवाईकांकडे रहायची. प्रियाकांने ‘अनफिनिश्ड’ मध्ये ती शाळेत असताना, एका मुलाच्या प्रेमात पडल्याचा किस्सा सांगितला आहे.

Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
when siddharth chopra broke up with ishita kumar
पहिला साखरपुडा मोडल्यावर पाच वर्षांनी प्रियांका चोप्राच्या भावाने नीलमशी केला रोका, कोण होती ‘ती’?
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

“दहावीत असताना मी माझ्या मावशीकडे रहायला होते. शाळेतच माझी बॉब नावाच्या मुलाबरोबर ओळख झाली. मी त्याच्या प्रेमात पडले. त्याने मला भेट म्हणून चैनसुद्धा दिली होती. एकदिवस बॉब माझ्या घरी आला होता. आम्ही दोघे अंथरुणावर बसून टीव्ही बघत होतो. दोघांचेही हात परस्परांच्या हातात होते. अचानक मी खिडकीबाहेर पाहिले, तर माझी मावशी जिने चढताना दिसली. मी गोंधळून गेले, नेमकं काय करावं ते समजत नव्हतं” असे प्रियांका म्हणाली.

पुढे प्रियांका म्हणाली, ‘दुपारचे दोन वाजले होते. ही तिची घरी परतण्याची वेळ नव्हती. बॉबला घराबाहेर पडणे शक्यच नव्हते. आम्ही दोघेही माझ्या रुमच्या दिशेने पळालो. त्याला मी माझ्या रुममधील कपाटात लपवले. मी किरण मावशीला किराणा सामानाच्या दुकानात पाठवत नाही, तो पर्यंत आतमध्येच रहा, असे मी त्याला सांगितले. किरण मावशी घरी आली व तिने प्रत्येक रुम तपासायला सुरुवात केली. माझे वाचन चालू आहे, हे दाखवण्यासाठी पुस्तक घेऊन मी माझ्या बिछान्यावर बसले होते. ती माझ्या रुमच्या दरवाजाजवळ आली, आणि दरवाजा उघडायला सांगितला. तिने मला माझ्या कपाटाचा दरवाजा उघडायला सांगितला. मी हादरुन गेले, मी माझ्या मावशीला इतक्या रागात कधी पाहिलं नव्हतं. मी दरवाजा उघडला आणि बॉब त्यातून बाहेर पडला” असं प्रियांकाने पुस्तकात लिहिलं आहे.

“मावशीने माझ्या आईला फोन केला व तिला सर्व प्रकार सांगितला. ती माझ्या तोंडावर खोट बोलतेय, यावर माझा विश्वास बसत नाही. तिच्या कपाटातून मुलगा बाहेर पडला” असे तिने माझ्या आईला सांगितले.