News Flash

‘ट्रोलिंगला घाबरून लग्न झाल्याचा आनंद साजरा करायचा नाही का?’ प्रियांकाचा सवाल

"मी जर अभिनेत्री नसते आणि एक सामान्य मुलगी असते तर माझ्या इंस्टाग्राम खात्यावर माझ्या नवऱ्याचे फोटो नसते का?" असा खडा सवाल तिने केला.

प्रियांका चोप्रा

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा व अमेरिकन गायक निक जोनास हे दोघेही २०१८ रोजी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या जोडप्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्याबद्दल ‘द कट’ या मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखावरून मोठा वाद सोशल मीडियावर निर्माण झाला होता. प्रियांका आणि निक यांच्या नात्यावर या लेखातून आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. तिचा उल्लेख लेखिकेनं ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा केला होता.

आता ते आर्टिकल काढून टाकण्यात आले आहे. ‘संडे टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने हा विषय पुन्हा काढला. या घटनेवर तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती हेही तिने यावेळेस सांगितले. ती म्हणाली की, “मी त्यावेळेस काहीच व्यक्त झाले नाही. मी निकला शोधत हॉटेल रूमवर गेले. आई, निक, सोफी सगळेजण रागाने फोनवर बोलत होते. असं लिहिण्याची त्यांची हिंमतच कशी होते असे त्यांचे म्हणणे होते ”

ट्रोलिंगबाबत बोलताना प्रियांका म्हणाली की, ” मी सोशल मीडियावर निकसोबत फोटो टाकते त्यावरून लोक मला ट्रोल करतात. मी जर अभिनेत्री नसते आणि एक सामान्य मुलगी असते तर माझ्या इंस्टाग्राम खात्यावर माझ्या नवऱ्याचे फोटो नसते का?” असा खडा सवाल तिने केला. “प्रसिद्ध असले म्हणून मी नवीन लग्न झाल्याचा आनंद साजरा करायचा नाही का? अभिनेत्री झाल्यानंतर मी गोपनीयतेचा हक्क सोडूनच दिला आहे. पण, तरीही मी वैयक्तिक गोष्टींबाबत गुप्तता बाळगते.” असं ती म्हणाली. “जेव्हा मी वाईट पद्धतीने ट्रोल होते तेव्हा मला निक खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो.” असं ती म्हणाली.

शोनाली बोसच्या आगामी ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 4:40 pm

Web Title: priyanka chopra nick jonas global scam artist
Next Stories
1 ’83’ चित्रपटासाठी कपिल देव यांच्याकडून रणवीला ‘ही’ खास भेट
2 Bigg Boss 2 : वीणा-वैशालीमध्ये उडणार वादाचा भडका
3 Bigg Boss Marathi 2 : सगळे सदस्य होणार का नॉमिनेट?
Just Now!
X