23 September 2020

News Flash

लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने व्यक्त केली आई होण्याची इच्छा

आई होण्यासोबत प्रियांकाची आणखी एक इच्छा आहे

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला काही महिने उलटल्यानंतरच प्रियांका गर्भवती असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. यावर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी प्रियांका गर्भवती नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र आता चक्क प्रियांकानेच तिला आई व्हायचं आहे असं सांगितलं आहे. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने ही इच्छा व्यक्त करुन दाखवली.

झालेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाने तिच्या काही इच्छांचा खुलासा केला. यामध्ये तिला आई व्हायचं आहे, घर खरेदी करायचं आहे. या आणि अशा अनेक इच्छा असल्याचं सांगितलं. ‘माझ्या काही इच्छा- आकांक्षा आहेत. खरं तर या गोष्टींविषयी मी आधी फारसा विचार केला नव्हता. पण आता करतेय. मला आई होण्याची इच्छा आहे. त्यासोबतच मला एक घरदेखील खरेदी करायचं आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी घर घेण्याचा विचार केला नव्हता. फक्त बॅग घ्यायचे आणि इथून-तिथे फक्त प्रवासच करायचे’, असं प्रियांकाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, ‘मी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वास नेते. मात्र तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. या जगात कोणतीच गोष्ट सहज आणि फुकट मिळत नाही. मेहनत, निश्चय आणि त्याग या गोष्टींचा अवलंब केला की आपल्याला हवी असलेली गोष्ट नक्कीच मिळते. त्यामुळे मला या गोष्टींची कधीच भीती वाटत नाही’.

दरम्यान, सध्या प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 10:23 am

Web Title: priyanka chopra says she want to experience motherhood ssj 93
Next Stories
1 अभिनेता मामूट्टी यांनी सांगितलं मल्याळम सिनेमात सलमानला एण्ट्री न मिळण्याचं कारण
2 टॉलिवूडची सुपरहिट जोडी; अशी आहे नागार्जुनच्या मुलाची लव्हस्टोरी
3 कॅन्सरमुक्त झाल्यानंतर ऋषी कपूर यांचं दमदार कमबॅक
Just Now!
X