News Flash

प्रियांकाने शेअर केला मांजरीचा व्हिडीओ; तुमच्या चेहऱ्यावरही येईल हसू

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. या बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. ती सतत सोशल मीडियाद्वारे तिच्या खासगी तसेच व्यावसायिक जीवना विषयी माहिती चाहत्यांना देताना दिसते. तसेच ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच प्रियांकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आहे.

प्रियांकाने मांजरींचा त्यांच्या मालकांसोबतचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याचे फिल्टर वापरुन मालकांचा चेहरा मांजरीसारखा दिसत आहे. तो चेहरा मोबाईल कॅमेरामध्ये पाहिल्यावर मांजरींचे गोंधळलेले चेहरे पाहायला मिळाले आहेत. काही मांजरींनी तर आपल्या सारखाच चेहरा कॅमेरामध्ये पाहून मालकांच्या मांडीवरुन खाली उडी मारली आहे तर काहींनी मालकांवर हल्ला केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

प्रियांकाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच हा फोटो शेअर करत प्रियांकाने छान असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात प्रियांकासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तसेच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई ही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 5:35 pm

Web Title: priyanka chopra shares video of cats reacting to cat filter and it is hilarious avb 95
Next Stories
1 होऊ दे खर्च : विराट अनुष्कानं लग्नासाठी केलेल्या खर्चाचा आकडा माहिती आहे का?
2 ‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
3 ‘कोंढाण्या’ला बॉलीवूडचे ग्लॅमर
Just Now!
X