News Flash

‘धकधक गर्ल’ आणि ‘देसी गर्ल’ करणार एकत्र काम

कॉमेडी टीव्ही सीरिजसाठी प्रियांका आणि माधुरी करणार एकत्र काम

प्रियांका चोप्रा, लेखक श्री राव, माधुरी दीक्षित

प्रियांका चोप्रा आणि माधुरी दीक्षित एका टिव्ही सीरिजमध्ये एकत्र काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. या सीरिजचे लेखक श्री राव यांनी ट्विटरवरून या बातमीला दुजोरा दिला. ‘या दोन प्रख्यात आणि दिग्गज व्यक्तींसोबत माझा नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याबाबत मी खूप उत्साही आहे,’ असं श्री राव यांनी ट्विट केलंय. त्याचबरोबर माधुरी आणि प्रियांकासोबतचा त्यांनी एक फोटोदेखील शेअर केलाय.

या टिव्ही सीरिजची संकल्पना अत्यंत अनोखी असून यामध्ये माधुरी दीक्षितची कथा दाखवण्यात येणार आहे. एक बॉलिवूड स्टार जी युएसएला स्थायिक होते, परदेशात कुटुंबियांसोबतचं तिचं जीवन, जीवनातील अनेक अनुभव यांवर ही टिव्ही सीरिज आधारित असणार आहे. विशेष म्हणजे माधुरी स्वत: या शोची कार्यकारी निर्माती असून तिचा पती श्रीराम नेनेसुद्धा या प्रोजेक्टचा भाग असल्याची माहिती मिळतेय.

माधुरीसोबतच प्रियांका चोप्रासुद्धा या शोची कार्यकारी निर्माती आहे. मार्क गॉर्डन कंपनी Mark Gordon Company (MGC) आणि एबीसी स्टुडिओ ABC studios या शोचे निर्माते आहेत. प्रियांका आणि माधुरीशिवाय आणखी कोण या टिव्ही सीरिजमध्ये असतील याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. त्याचप्रमाणे ही एक कॉमेडी सीरिज असल्याचं म्हटलं जातंय.

वाचा : सुशांतकडून क्रितीला वाढदिवसाची सरप्राईज पार्टी?

प्रियांका जेव्हा भारतात आलेली तेव्हा याबद्दल ती म्हणालेली की, ‘टिव्ही सीरिजची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. सर्वकाही निश्चित झाल्यानंतर मी तुम्हाला याबाबत नक्की सांगेन. जवळपास एक वर्षापासून मी या सीरिजवर काम करतेय.’ या टिव्ही सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ आणि ‘देसी गर्ल’ एकत्र येणार आहेत. माधुरी दीक्षितचे जीवन या टिव्ही सीरिजच्या माध्यमातून जवळून पाहायला मिळणार हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:36 pm

Web Title: priyanka chopra will be collaborating with madhuri dixit for a comedy tv series
Next Stories
1 कॉमेडीचा ‘बेताज बादशहा’ जॉनी वॉकर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी..
2 सुशांतकडून क्रितीला वाढदिवसाची सरप्राईज पार्टी?
3 क्रिती सनॉनवर भैरवी गोस्वामीची अर्वाच्च शब्दांत टीका
Just Now!
X