X
X

निक-प्रियांकाच्या लग्नात घडलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सासूबाई नाराज!

एका मुलाखतीत डेनिस यांनी नाराजी व्यक्त केली आहे

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा स्वप्नवत सुंदर असा आलिशान विवाहसोहळा डिसेंबर २०१८ मध्ये पार पडला. या सोहळ्यातली प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. राजस्थानमधील जोधपूरमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. तसंच या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं. मात्र या लग्नामध्ये प्रियांकाच्या सासूबाई अर्थात निकची आई डेनिस या काहीशा नाराज असल्याचं समोर येत आहे.

मुलाच्या लग्नामध्ये वरमाईचा थाट काही निराळाच असतो. त्यामुळे लग्नात होणारी प्रत्येक गोष्ट मुलाच्या आईचं मन राखून होत असते. मात्र प्रियांकाच्या लग्नात तिची सासू नाराज असल्याचं पाहायला मिळालं. या मागचं कारणही तसंच असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीत प्रियांकेच सासरे पॉल केविन जोनस आणि सासू डेनिस यांनी निक-प्रियांकाच्या लग्नातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच यावेळी डेनिस यांनी ग्रॅण्ड वेडिंगबाबत तक्रारही केली.

डिसेंबर २०१८ मध्ये राजस्थानमधील उमेद भवन पॅलेस येथे निक आणि प्रियांका विवाहबंधनात बांधले गेले. त्यावेळी या लग्नसमारंभातील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र हे फोटो डेनिस यांना आवडले नाहीत. त्यांच्यामते ज्या भव्यतेने हे लग्न पार पडलं त्यानुसार हे फोटो नव्हते.
“निक-प्रियांकाने ग्रॅण्ड वेडिंग केलं होतं. त्यामुळे या लग्नात जेवढी भव्यता होती. ही फोटोग्राफरने योग्यरित्या कॅप्चर केली नाही. या फोटोपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने फोटो काढता आले असते. लग्नातला खरा शाहीपणा या फोटोमध्ये उतरवता आला असता”, असं त्यांनी सांगितलं.

वाचा : Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय ‘या’ हॉलिवूडपटांमध्ये काम

दरम्यान, पारंपरिक भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीत २ आणि ३ डिसेंबर रोजी उमेद भवन या आलिशान पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत प्रियांकानं राजकारण, क्रीडा आणि बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.

22
X