News Flash

एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील त्या सीनमुळे प्रेक्षक संतापले

एकता कपूरची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात

निर्माती एकता कपूर आपल्या वेब सीरिजमधील अॅडल्ट कॉन्टेंटमुळे प्रचंड चर्चेत असते. अनेकदा मालिकांमधील या प्रणय दृष्यांमुळे तिच्यावर टीका देखील करण्यात येते. अलिकडेच ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमधील एका दृष्यामुळे तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी तंतप्त प्रेक्षकांनी थेट एकताच्या घरावरच हल्ला केला आहे.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

एकता कपूरची ‘व्हर्जिन भास्कर २’ नावाची एक नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सीरिजमध्ये एक हॉस्टेल दाखवण्यात आलं आहे. या हॉस्टेलमध्ये काही अवैध्य कामं केली जातात. या हॉस्टेलचं नाव ‘अहिल्याबाई होळकर’ असं ठेवलं आहे. या नावामुळे प्रेक्षक संतापले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ४० ते ५० जणांच्या जमावाने एकताच्या बंगल्याभोवती निदर्शनं केली. शिवाय तिच्या घरावर दगडफेक देखील केली. दरम्यान अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून ‘व्हर्जिन भास्कर २’ मधील तो सीन हटवण्याची मागणी केली आहे.

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

कोण होत्या अहिल्याबाई होळकर?

अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. धर्म, संस्कृती परंपरा यांचा त्यांनी कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृद्ध केले. अनेक किल्ले, विश्रामगृहे, विहीरी आणि रस्ते तयार करण्यासाठी त्यांनी सरकारी पैशांचा हुशारीने वापर केला. लोकांसह सण साजरे केले. केवळ दक्षिण भारतातच नाही तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी हे कार्य केले आहे. सोमनाथ, काशी, गया, अयोध्या, द्वारका, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनारायण, रामेश्वर, मथुरा आणि जगन्नाथपुरी अश्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दानधर्म केले. या बरोबरच, त्यांनी लोकांसाठी वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपाद मंदिर आणि बैजनाथ या मुख्य तीर्थक्षेत्रांच्या आसपास अनेक घाट आणि धर्मशाळा बांधल्या. मुस्लिम आक्रमकांनी मोडलेली मंदिरे पाहून त्याने सोमनाथमध्ये शिव मंदिर बांधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 5:12 pm

Web Title: protesters stones attack on ekta kapoors house mppg 94
Next Stories
1 कंगनाच्या ‘बाबर सेना’ला संजय राऊतांचं उत्तर; बाबरी पाडणारे आम्हीच आहोत
2 बाईकच्या क्रेझने देवदत्त नागेला मिळाला अनोखा टॅटू
3 लष्करे कुटुंबात थाटामाटात साजरा होणार सिध्दीचा वाढदिवस
Just Now!
X