सध्या बिग बॉसचे घर एका वेगळणावर येऊन पोहोचले आहे. काही कारणास्तव घराबाहेर पडलेले स्पर्धक शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले यांची पुन्हा घरात एन्ट्री झाली आहे. त्यांच्या परत येण्याने काहींना आनंद झाला आहे तर काहींनी त्यांचे येणे फारसे आवडले नसल्याचे जाणवत आहे. परंतु बिग बॉसने दिलेले टास्क चांगल्या प्रकारे, शक्कल लढवून कशा प्रकारे पार पाडायचा याचा विचार मात्र सर्व स्पर्धक करत असतात. दरम्यान बिग मराठी पर्व पहिलेमधील स्पर्धक पुष्कर जोगने घरातील स्पर्धकांची टास्क दरम्यानची भांडणे पाहून फेसबूक पोस्टद्वारे राग व्यक्त केला आहे.

बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्यादरम्यान विणा आणि शिवानीमध्ये वाद होतो. त्याची ती भांडणे पाहून पुष्कर जोगने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘मी तुमच्या सर्वांमध्ये माझा आवडता स्पर्धक शोधण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तुम्ही किती लाजिरवाणे आहात हे सिद्ध करण्यात तुम्ही जिंकलात. मला घराबाहेर अजिबात भेटू नका. मला तुमच्या विषयी आदर वाटत नाही’ असे पुष्करने पोस्टमध्ये लिहिले होते.

पुष्कर जोग हा बिग बॉस मराठी पर्व पहिलेमधील सर्वांचा लाडका आणि तितकाच चर्चेत असलेला स्पर्धक होता. पहिल्या पर्वात पुष्कर आणि सई लोकूर यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगाल्या होत्या. त्यानंतर घरात आणि घराबाहेर या दोघांच्या मैत्रीची विशेष चर्चा रंगली होती. त्यामुळे या दोघांमुळेच पुष्कर आणि जास्मिनमध्ये काही तरी अलबेल झाल्याचे म्हटले जात. मात्र या साऱ्यावर पुष्करने प्रतिक्रिया देत साऱ्यांची तोंड बंद केली आहेत.