08 July 2020

News Flash

राधिका आपटेचा ‘फोबिया’ चित्रपटातील फर्स्ट लूक

सर्वांची झोप उडवणा-या 'फोबिया' चित्रपटाच्या टिझरची चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात रंगली आहे.

राधिका आपटेचा 'फोबिया' हा चित्रपट

‘बदलापूर’, ‘हंटर’, मांझी अशा चित्रपटातील बोल्ड भूमिकांमधून चर्चेचा विषय ठरलेली मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आता आपल्या चाहत्यांची झोप उडविण्यास सज्ज झालीआहे. राधिका आपटेच्या आगामी ‘फोबिया’या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे . सर्वांची झोप उडवणा-या ‘फोबिया’ चित्रपटाच्या टिझरची चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात रंगली आहे.
विकी रजनीच्या सायकोलॉजीकल थिमवर आधारीत ‘फोबिया’ चित्रपटात राधिका दिसणार आहे. हा चित्रपट पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे.
राधिका सध्या सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तामिळ गँगस्टरवर आधारीत या सिनेमाचं शुटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. या ‘काबिल’ सिनेमात राधिका रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2016 3:40 pm

Web Title: radhika apte first look in phobia movie
टॅग Radhika Apte
Next Stories
1 VIDEO: असा घडला ‘फॅन’मधील २५ वर्षांचा गौरव…
2 दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
3 विद्या बालन साकारणार ‘बेगम जान’
Just Now!
X