19 February 2020

News Flash

राखी सावंत होणार आई?; शेअर केला ‘हा’ फोटो

ब्रिटीश अभिनेत्री आणि गायिका सोफिया हयातने दिल्या शुभेच्छा

राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिचे ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने गुपचूप लग्न केल्याची कबुली दिली. इतकंच नव्हे तर तिने हनिमूनचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या सर्वांत मात्र तिचा पती कोण हे मात्र अद्याप कोणी पाहिले नाही. माझ्या पतीला सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमे फार आवडत नाहीत म्हणून तो या सर्वांपासून लांब आहे, असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. आता आणखी एका फोटोमुळे राखी पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक आई बाळासह दिसून येत आहे. हा फोटो पाहून राखी गरोदर असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. अनेकांनी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच राखीची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री सोफिया हयात हिनेसुद्धा राखीसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती राखीला शुभेच्छा देताना दिसत आहे.

आणखी वाचा : ”पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा,” शिल्पा शिंदेचं खुलं आव्हान

”राखी तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. मला असं कळलं आहे की पतीला भेटायला तू लवकरच इथे लंडनला येणार आहेस. त्याचसोबत तुझ्याकडे एक आनंदाची बातमीसुद्धा आहे असं मला समजलं आहे. मी लवकरच काकी होणार आहे आणि तुझ्यासाठी मी फार खूश आहे,” असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

राखीच्या गरोदरपणाच्या चर्चा खऱ्या की आहेत की खोट्या हे तर तीच स्पष्टपणे सांगू शकेल. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत कसं राहावं हे मात्र राखीला अचूक ठाऊक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

First Published on August 25, 2019 1:37 pm

Web Title: rakhi sawant shared picture on instagram trolls says she is pregnant ssv 92
Next Stories
1 Video : ‘दीपिकाला पाहून मला उलटी येते’, पाकिस्तानी निवेदक बरळला
2 सारा अली खानमुळे सापडला त्यांचा हरवलेला मुलगा
3 ”पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा,” शिल्पा शिंदेचं खुलं आव्हान
Just Now!
X