News Flash

अभिनय पाहून टिक-टॉक गर्लला दिली चित्रपटाची ऑफर, नंतर केलं ट्विट डिलिट

त्यांनी हे ट्विट डिलिट का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे

काही दिवसांपूर्वी निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती देत एप्रिल फूल केले होते. पण या ट्विटनंतर त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली होती. तेव्हा पासून राम गोपाल वर्मा चर्चेत आहेत. आता त्यांनी एका टिक-टॉक गर्लला चित्रपटाची ऑफर दिल्याने ते पुन्हा चर्चेत आहेत.

द ग्रेट आंध्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलीने टिक-टॉकवर राम गोपाल वर्माची नक्कल केली होती. तिचा तो पफॉर्मन्सपासून राम गोपाल वर्मा खूश झाले असून त्यांनी त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर तिला दिली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर त्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. तो फोटो शेअर करत त्यांनी ‘जर तुला अभिनय क्षेत्रात रुची असेल तर माझ्या मेल आयडीवर तुझी संपूर्ण माहिती पाठव’ असे ट्विटमध्ये म्हटले होते. पण काही कारणास्तव त्यांनी त्यांचे हे ट्विट डिलिट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मेल आयडी दिल्यामुळे ते डिलिट केल्याचे म्हटले जात आहे.

@aquagirla##Rgv fan ##thop

♬ original sound – boysgully9

बऱ्याचदा राम गोपाल वर्मा नव्या कलाकारांसोबत काम करण्यात उत्साही असल्याचे पाहायला मिळते. अशातच त्यांनी या मुलीला देखील चित्रपटाची ऑफर दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 4:59 pm

Web Title: ram gopal varma offers film to a tiktok girl after being impressed with her acting on social media avb 95
Next Stories
1 रामायणीतील लक्ष्मणाचा जुना फोटो होतोय व्हायरल, पाहून नेटकरी पडले प्रेमात
2 रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड; केआरकेचा उपरोधिक टोला
3 कंगनाच्या बहिणीचा ट्विटर अकाऊंट सस्पेंड; ट्विटरची कारवाई
Just Now!
X