29 September 2020

News Flash

संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच ऑनस्क्रीन ‘संजू’ने घेतली भेट

आलिया आणि रणबीरचे संजय दत्तच्या घरातून बाहेर पडतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्तने सोशल मीडिया पोस्टद्वारे कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगितले. पण संजय दत्तने हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर संजय दत्ताला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. त्यामुळे कलाविश्वातील सर्वांनाच हादरा बसला. तसेच चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच ऑनस्क्रीन ‘संजू’ म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरने देखील संजय दत्तची भेट घेतली आहे.

बुधवारी रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्टने संजय दत्तची भेट घेतली. ते दोघेही रात्री संजय दत्तच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यांचे संजय दत्तच्या घरातून बाहे पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर कपूरच्या एका फॅन पेजने रणबीर आणि आलिया यांचे संजय दत्तच्या घरातून बाहेर पडतानाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. आता तो उपचारासाठी परदेशात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. संजय दत्त लवकर बरा व्हावा म्हणून अनेक चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 6:31 pm

Web Title: ranbir kapoor actress alia bhatt spotted leaving sanjay dutts house avb 95
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण: कंगना रणौतचा संजय राऊत यांना उपरोधिक टोला; म्हणाली…
2 ‘आता तुमची वेळ संपली’, सडक २चा ट्रेलर पाहून कंगनाचा रणबीर आणि आलियावर निशाणा
3 संजूबाबाला कॅन्सर झाल्याचं वृत्त ऐकताच सर्किट म्हणाला…
Just Now!
X