X
X

तुम्ही या गोंडस मुलाला ओळखलंत का?, जाणून घ्या कोण आहे हा आघाडीचा अभिनेता

READ IN APP

काही दिवसांपूर्वी याने वयाच्या बाराव्या वर्षीपासुन शरीरसंबंध ठेवल्याची कबुली दिली होती.

अभिनेता रणवीर सिंहने अनोखी शैली जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या ड्रेसिंग स्टाईल व आव्हानात्मक व्यक्तिरेखांसाठी ओळखला जाणारा रणवीर सोशल मिडियाच्या माध्यमातून सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात असतो. समाजमाध्यमांवरील त्याच्या पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान त्याने नुकतीच केलेली एक पोस्ट सध्या इटरनेटवर चर्चेत आहे.

रणवीर सिंहने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत त्याने लाल रंगाचा रेनकोट व निळ्या रंगाचे स्पोर्ट शूज घातले आहेत. या फोटोत रणवीर खुप गोंडस दिसत आहे. या फोटोखाली त्याने all good in the hood असे कॅप्शन दिले आहे. तसेच ही पोस्ट त्याने अभिनेता वरुण धवन व दिग्दर्शक शानू शर्मा यांच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी देखील त्याच्या बालपणीच्या या फोटोचे खुप कौतूक केले आहे.

काही दिवसांपूर्वीच वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची कबुली अभिनेता रणवीर सिंगने दिली होती. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने हा खुलासा केला होता. १२ वर्षांचा असताना मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते, असं तो म्हणाला होता.

”मी प्रत्येक गोष्ट खूप कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मी शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी यात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटायला लागलं होतं,” असे रणवीरने सांगितले होते.

22
X