News Flash

रात्रीस खेळ चाले – २ : शेवंताचा खून की आत्महत्या

मालिकेच्या आगामी भागात शेवंताचा नवरा आत्महत्या करणार हे जवळपास निश्चित आहे.

अण्णा नाईक यांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेत आतापर्यंत ५ खून केले आहेत. या पार्श्वभूमिवर विचार करता अण्णा आता शेवंताचाही खून करणार का?

गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित करणाऱ्या या मालिकेतील कथानकाने आता आणखी एक नवीन वळण घेतले आहे.

मालिकेचे कथानक सध्या अण्णा व शेवंता यांच्या भोवती फिरत आहे. शेवंता व अण्णा यांच्या अनैतिक नात्यासंबंधी सर्व माहिती शेवंताच्या पतीला कळली आहे. सुशीला ही अण्णांचीच मुलगी आहे, या धक्कादायक माहितीमुळे शेवंताचा पती अक्षरश: वेडा झाला. या सर्व प्रकाराचा जाब तो अण्णांना विचारतो, परंतु अण्णा त्याला अक्षरश: उडवून लावतात. या सर्व प्रकाराची जबाबदारी ते त्याच्याच माथी मारतात. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात शेवंताचा नवरा आत्महत्या करणार हे जवळपास निश्चित आहे.

आणखी वाचा : Video : अनोख्या थीमवर साकारलेले ‘बिग बॉस १३’चं आलिशान घर

मात्र शेवंताचे निधन कसे होणार याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. रात्रिस खेळ चाले – २ ही एक प्रिक्वेल मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात शेवंताच्या खूनाचे कथानक दाखवण्यात आले होते. पोलिसांनी अथक प्रयत्न करुनही तिच्या खुनाचा उलगडा झाला नव्हता. सध्याचे कथानक पाहाता शेवंताने आपल्या नवऱ्याच्या आत्महत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिला अपयश आले. त्यामुळे आण्णा नाईक यांनीच तिचा खून केला होता का? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:20 pm

Web Title: ratris khel chale 2 anna naik shevanta mppg 94 2
Next Stories
1 मराठी वेब सीरिजचा धुमाकूळ!
2 Laal Kaptan: नागा साधूच्या भूमिकेत सैफ; अंगावर काटा आणणारा ट्रेलर
3 Video : बबितासोबत जेठालालचा ‘हा’ रोमॅण्टिक डान्स पाहिलात का?
Just Now!
X