News Flash

‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

तिने रिटर्न गिफ्ट देखील मागितले आहे.

आज १० जून रोजी मालिकेत दत्ता हे पात्र साकरणाऱ्या सुहास शिरसाटचा वाढदिवस

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ गूढ आणि थराराने परिपूर्ण अशा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आज १० जून रोजी मालिकेत दत्ता हे पात्र साकारणाऱ्या सुहास शिरसाटचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या पत्नीने त्याला सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहासचा जन्म १० जून १९८१ रोजी झाला. आज तो ४० वर्षांचे झाला आहे. त्या निमित्ताने त्याची पत्नी स्नेहा माजगावकरने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तिने सुहासचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘हे धक्कादायक होतं’, इंडियन आयडलमधून बाहेर पडताच अंजली गायकवाडने सोडले मौन

स्नेहाने हा व्हिडीओ शेअर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा… असच मी म्हणेन ते करत रहा’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या तिने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील सुहासची दत्ता ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. त्याला अनेकजण दत्ता याच नावानेच ओळखतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुहासने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने शाहिद कपूरच्या ‘कमीने’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 6:26 pm

Web Title: ratris khel chale datta naik aka suhas shirsat birthday avb 95
Next Stories
1 The Family Man 2 : काय… अरविंदच आहे खरा व्हिलन?; ‘सुची’च्या वागण्याबद्दल शरद केळकरचा मोठा खुलासा
2 स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हणत कंगनाने शेअर केले बिकिनीमधील फोटो
3 हॉटेलमध्ये केलेल्या ‘त्या’ चुकीसाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत उर्वशीने मागितली माफी
Just Now!
X