प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी रेमोला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता रेमोला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच जंगी स्वागत केलं आहे.

रुग्णालयातून घरी गेल्यावर रेमोने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या स्वागतासाठी खास जय्यत तयारी केल्याचं दिसून आलं. रेमोचा हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असून बॅकग्राऊंडसा गणपती बाप्पाचं गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रेमोने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

“माझ्यावर प्रेम, आशिर्वाद आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. मी परत आलो आहे”, असं कॅप्शन देत रेमोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे सध्या त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

वाचा : पार्टीतल्या ‘त्या’ व्हिडीओविषयी करण जोहरचं अजब उत्तर, म्हणाला…

१९९५ मध्ये रेमोने कलाविश्वात पदार्पण केलं. २००० मध्ये त्याने ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटासाठी कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर त्याने अनेक प्रसिद्ध गाण्यांच्या कोरिओग्राफी केली आहे. त्याशिवाय रेमोने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून जबाबदारीदेखील पार पाडली आहे.