07 March 2021

News Flash

पॉर्न स्टार ते सुपरस्टार, ‘शकीला’चा ट्रेलर प्रदर्शित

शकीलाची भूमिका अभिनेत्री रिचा चड्ढा साकारणार आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच ‘शकीला’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शकीला चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. पंकज त्रिपाठी एक यशस्वी अभिनेत्याची भूमिका चित्रपटात साकारणार आहेत तर रिचा चड्ढा शकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘शकीला’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही सिल्क नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे दाखवल्याने झाली आहे. तिच्या निधनानंतर तिची जागा पॉर्न स्टार शकीला घेते. त्यानंतर तिची ओळख पंकज त्रिपाठीशी होते. पंकज त्रिपाठी हे चित्रपटात एक यशस्वी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा २ मिनिटे ३९ सेकंदाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा ट्रेलर आतापर्यंत जवळपास ११ लाख लोकांनी पाहिला आहे.

९० च्या दशकात शकीला ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने २५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शकीलाचे प्रचंड चाहते होते. तिचा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार त्यादिवशी इतर अभिनेते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणे टाळायचे. इंद्रजीत लंकेश हे ‘शकीला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 7:18 pm

Web Title: richa chaddha is playing the role of a prostitute in her upcoming movie shakeela with pankaj tripathi dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या टीमची धमाल
2 “लो बजेट हॅरी पॉटर”; अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
3 ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
Just Now!
X