नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं स्वरुप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या आंदोलनाला जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाचे समर्थन केले. फक्त रिहानाने नाही तर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने आणि पॉर्नस्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण रिहानाने शेतकऱ्यांचे समर्थन करताच अभिनेत्री कंगना रणौतने तिला फटकारले. आता कंगनाचे एक जुने ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारे ट्वीट हे कंगनाने मे २०१९ मध्ये केले होते. या ट्वीटमध्ये तिने रिहानाचे डायमंड हे गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या कंगनाचे हे जुने ट्वीट व्हायरल झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय होते रिहानाचे ट्वीट?
‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असे ट्वीट रिहानाने केले होते. सोबतच तिने हॅशटॅग वापरत ‘FarmersProtest’ असे म्हटले होते.

का म्हणाली होती कंगना?
“याविषयी कोणी व्यक्त होत नाही कारण ते शेतकरी नसून भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. चीनसारखे देश आपल्या देशावर ताबा मिळवतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही, जो आमचा देश विकू”, असं सणसणीत प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिले आहे.