26 September 2020

News Flash

ओळखा कोण आहे हा चिमुकला? आता आहे बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध अभिनेता

दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अभिनेता ऋषी कपूर यांनी देखील आपल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले ऋषी कपूर?

ऋषी कपूर यांनी तोंडाला गुलाल लावलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटो त्यांच्या लहाणपणीचा आहे. या फोटोवर त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्याच पण त्याचबरोबर करोना वायरसपासून सावधान राहाण्याचा इशाराही दिला.

ऋषी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या बालपणीच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात. अनेकदा ते स्वत:बरोबरच इतर कलाकारांचेही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 11:18 am

Web Title: rishi kapoor happy holi 2020 coronavirus mppg 94
Next Stories
1 नेहासोबत लग्नाच्या चर्चांनंतर आदित्यने घेतला छोट्या पडद्यावरुन ब्रेक
2 “अर्जुन कपूरमुळे YES Bank बुडाली”
3 ‘माझ्या नवऱ्यापासून दूर रहा’; भारतीने दिली ‘या’ अभिनेत्रीला ताकीद
Just Now!
X