24 April 2019

News Flash

‘माऊली आला रे’, रितेशच्या चित्रपटाचा टीझर शेअर करत शाहरुखने दिल्या शुभेच्छा

'माऊली'च्या निमित्ताने पुन्हा एकदा अजय- अतुलच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

रितेश देशमुख, 'माऊली' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया एकत्र येत ‘माऊली’ प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने या चित्रपटाचा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे.

जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद आहेत. ‘आपलं नाव ऐकलं नाय, असं एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडलं तर माऊली आपलं नाव नाही,’ या संवादाने रितेशची एण्ट्री होते. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

शाहरुखने रितेशच्या या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यामागचं कारण म्हणजे त्याच्या ‘झीरो’ या चित्रपटाशी बॉक्स ऑफीसवर टक्कर टाळण्यासाठी रितेशने ‘माऊली’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळीसुद्धा शाहरुखने ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहित रितेशचे आभार मानले होते.

१४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. त्यामुळे ‘माऊली’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

First Published on November 8, 2018 12:02 pm

Web Title: riteish deshmukh marathi movie mauli teaser released shah rukh khan shared it