सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या ‘बँजो’ या आगामी चित्रपटाने चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आपल्या मजेदार शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या रितेशचा गंमतीदार अंदाज सर्वांना भावतो. उत्तम कथानकावर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या कृषिका लुल्ला यांनी अलिकडेच ‘बँजो’ चित्रपटाची घोषणा केली. ‘बँजो’चे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव करीत असून, अलिकडेच रितेशने चित्रपटाच्या सेटवरून अनेक मजेशीर छायाचित्रे एका मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. यातील एका छायाचित्रात रितेशचा सिक्स पॅक लूक पाहायला मिळतो. आपल्या पोटावर सहा बिस्किटे ठेऊन रितेशने हा सिक्स पॅक लूक प्राप्त केला. रितेशचा हा मजेशीर अंदाज पाहून त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरदेखील नक्कीच हसू उमटले असणार. रितेशचे सेटवर असणे हा एक गंमतीदार अनुभव असल्याचे सांगत, चित्रपटसृष्टीतील हा उत्तम अभिनेता कॅमेऱ्यामागेदेखील तितकाच गंमतीशीर आणि धमाल-मस्ती करणारा असल्याचे कृषिका म्हणाल्या.

पाहा रितेशचा सिक्स पॅक लूक

ritesh-six-pack