News Flash

‘टॉय स्टोरी’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ५५ व्या वर्षी झाले निधन

रॉब गिब्सला लहान मुलांचा दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब गिब्स याचे निधन झाले आहे. तो ५५ वर्षांचा होता. पिक्सार स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी त्याच्या निधनाची दिली. रॉबच्या निधनामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रॉब गिब्स गेली २० वर्ष हॉलिवूड सिनेसृष्टीत कार्यरत होता. पिक्सार स्टुडिओसाठी त्याने ‘टॉय स्टोरी २’, ‘फाइंडिंग निमो’, ‘इन्साईड आउट’, ‘मॉन्स्टर’, ‘कार टून्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. सुपरहिट कार्टूनपटांमुळे त्याला लहान मुलांचा दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे.

कोण होता रॉब गिब्स?

पिक्सार स्टुडिओ आपल्या कार्टून चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. या स्टुडिओमध्ये लेखकाच्या भूमिकेत रॉब गिब्सने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याने ‘टॉय स्टोरी’ आणि ‘अ बग्स लाईफ’ या चित्रपटांसाठी स्टोरी बोर्ड तयार करण्याचे काम केले होते. पाहता पाहता त्याने कार्टून चित्रपट तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान आत्मसाद केले. त्यामुळे दिग्दर्शन क्षेत्रातही त्याला हात आजमवण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘द इन्क्रेडिबल’, ‘रॅटाटुई’, ‘द कार्स’ यांसारख्या ब्लॉगबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. रॉब आपल्या कामात इतका तरबेज होता, की त्याच्यामुळे पिक्सार स्टुडिओचे चित्रपट थेट ऑस्करपर्यंत मजल मारु शकले. रॉब गिब्सच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 6:22 pm

Web Title: rob gibbs passes away at 55 mppg 94
Next Stories
1 ‘त्या’ एका दृश्यासाठी तापसीला सातवेळा कानाखाली खावी लागली
2 Video : नृत्य सादरीकरणातून नर्तकांनी दिला करोनाशी लढण्याचा संदेश
3 “…आणि मी शब्दहीन झाले”; लतादिदींनी पोस्ट केला ऋषी कपूर यांचा दुर्मिळ फोटो
Just Now!
X