20 November 2019

News Flash

Video : प्रभासच्या बहुप्रतिक्षित ‘साहो’चा टीझर प्रदर्शित

१५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'साहो'

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये अॅक्शनचा भरणा आहे. टीझरच्या सुरुवातीलाच श्रद्धा कपूर पाहायला मिळते. प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक आहे.

टीझरमधील अॅक्शन व दृश्ये एखाद्या हॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच वाटतात. ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 13, 2019 11:49 am

Web Title: saaho teaser released prabhas shraddha kapoor ssv 92
Just Now!
X