10 December 2018

News Flash

सब्यसाचीकडून ‘ते’ खास गिफ्ट घेताना राणी झाली भावूक

भारतीय फॅशन जगतातील आघाडीचं आणि सर्वात चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे सब्यसाची मुखर्जी.

फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, अभिनेत्री राणी मुखर्जी

भारतीय फॅशन जगतातील आघाडीचं आणि सर्वात चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे सब्यसाची मुखर्जी. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांचा तो आवडता फॅशन डिझायनर आहे. त्याच्या कलेक्शनमधले कपडे आपल्या ‘विश लिस्ट’मध्ये असावेत असं अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींना वाटत असतं. अशा या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच दागिने डिझाइन केले आहेत. पहिल्यांदाच डिझाइन केलेले कानातले त्याने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीला म्हणजेच राणी मुखर्जीला भेट म्हणून दिले आहेत.

हे पोलकी डिझाइनचे कानातले असून त्यामध्ये साऊथ सी पर्ल्सचा वापर करण्यात आला आहे. राणी सध्या तिच्या आगामी ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनच्याच एका कार्यक्रमात तिने सब्यसाचीने दिलेल्या भेटवस्तूसंदर्भात प्रसारमाध्यमांना सांगितले. हे सांगताना ती भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. सब्यसाची आणि राणी लवकरच एकत्र नेहा धुपियाच्या चॅट शोमध्येही हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : युट्यूबवर सलमान- कतरिनाच्या ‘स्वॅग’चाच बोलबाला

विद्या बालनचा लग्नसोहळा असो किंवा ऐश्वर्याची कान फेस्टिव्हलची वारी, ‘ब्लॅक’मधली राणीची व्यक्तिरेखा असो किंवा श्रीदेवीची अवॉर्ड सोहळ्यातली साडी, प्रत्येक खास ओकेजनला या आणि अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वेळोवेळी सब्यसाचीच्या डिझाइन्सना पसंती दिलेली आहे.

First Published on January 12, 2018 8:00 pm

Web Title: sabyasachi mukherjee gifts his first ever designed jewellery to rani mukerji