News Flash

सैफची ही बहिण आहे २७०० कोटींची मालकीण

औकाफ-ए-शाहीची ती प्रमुख असल्यामुळे पतौडी खानदानाच्या संपूर्ण संपत्तीचा हिशोब तिच बघते.

सैफची ही बहिण आहे २७०० कोटींची मालकीण
सैफ अली खान, सबा अली खान, शर्मिला टागोर

एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांना सैफ अली खान आणि सोहा अली खान ही दोन मुलं असल्याचं तर सर्वांनाच माहित आहे. त्यांची ही दोन्ही मुलं कला क्षेत्रात कार्यरत आहेत. पण त्यांची मोठी मुलगी सबा अली खान हिच्याबद्दल बऱ्याचजणांना माहिती नाहीये. सैफपेक्षा लहान आणि सोहापेक्षा मोठी असलेली सबा तब्बल २७०० कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे. सबाला लाइमलाइटपासून दूरच राहायला आवडते. ती चित्रपट आणि पेज ३ पार्ट्यांमध्ये कधीच दिसत नाही. कौटुंबिक समारंभ सोडता फार कमी कार्यक्रमांमध्ये आजवर सबाला पाहिले गेलेय. ज्वेलरी डिझायनर असलेली सबा अद्याप अविवाहीत आहे.

वाचा : अन् रागावलेल्या अमृता सिंगने सैफला फटकारले

सबा ही एक यशस्वी बिझनेस वूमन आहे. तिने स्वतःची डायमंड चेनही सुरु केली आहे. इतकंच काय तर, करिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यासाठी सैफने एक डायमंड नेकलेसही सबाकडूनच डिझाइन करून घेतला होता. भोपाळमधील औकाफ-ए-शाहीची ती प्रमुख आहे. नवाब कुटुंबातर्फे स्थापन करण्यात आलेली ही स्वतंत्र संस्था आहे.

वाचा : स्वतःचं घर घेण्यासाठी सलमानला कमी पडताहेत पैसे!

पतौडी खानदानातील बरीचशी मंडळी बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. मात्र, सबा चित्रपटांपासून दूर राहणेच पसंत करते. यामागचे कारण तिचा लाजरा स्वभाव असल्याचे म्हटले जाते. एका मुलाखतीत सबा म्हणालेली की, चित्रपटसृष्टीत जाण्याचा साधा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नाही. मी आता जिथे आहे, जे काम करतेय त्यामुळे मी आनंदात आहे. ४१ वर्षीय सबाने अद्याप लग्न केलेले नसून ती स्वतंत्रपणे तिचा व्यवसाय सांभाळत आहे. औकाफ-ए-शाहीची ती प्रमुख असल्यामुळे पतौडी खानदानाच्या संपूर्ण संपत्तीचा हिशोब तिच बघते. त्यामुळे जरी ती सैफ आणि सोहाप्रमाणे लाइमलाइटमध्ये नसली तरी ती तिच्या कामात बरीच व्यस्त असते.

करिना कपूर खान आणि सबामध्ये खूप चांगले संबंध आहेत. आपल्या वहिनीकरिता सबा अनेकदा ज्वेलरी डिझाइनही करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 12:36 pm

Web Title: saif ali khans younger sister is owner of 2700 crores property
Next Stories
1 सुहाना आणि धर्माविषयी शाहरुख म्हणतो…
2 अन् रागावलेल्या अमृता सिंगने सैफला फटकारले
3 …आणि रणबीर- कॅटमधीत मतभेद ‘त्या’ मुलाखतीत आले सर्वांसमोर
Just Now!
X