News Flash

रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव कळलं का?

या चित्रपटाचं शीर्षक आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं.

रिंकू राजगुरू

‘सैराट’मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं शीर्षक आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता या चित्रपटाच्या शीर्षकावरून पडदा उठला आहे. या चित्रपटाचं शीर्षक आहे कागर !

वाचा : मुंबईत या ठिकाणी होणार ‘विरुष्का’च्या लग्नाचे रिसेप्शन

रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या शीर्षका पोस्टरच्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. ‘कागर’चा फाँट हा बघताक्षणी आक्रमक वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा अधिक प्रभाव पाहावयास मिळतोय. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्न आहे, गुलाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे, की स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे. याचा अंदाज आपण हे शीर्षकाचे पोस्टर पाहून बांधू शकतो. ‘कागर’ या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाची जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढऱ्या डागांमुळे होत राहते. तसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसतो, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यामुळे या चित्रपटात बरीच नाट्यमयता असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह आणखी कोण कोणते कलाकार दिसणार ते लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

वाचा : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

चित्रपटाच्या शीर्षकाच्या पोस्टर डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, ‘जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. ‘कागर’चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्वाच्या घटकांचा विचार करून, खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचं मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा ‘कागर’चा फाँट तयार केला. चैतन्य संत हे नेहमी कथेची मांडणी आणि त्यावरून दृश्य स्वरुपात नेमक काय दिसेल याचा अंदाज घेऊन डिझाईन करतात. ‘रिंगण’ चित्रपटाच्या वेळी वडील – मुलगा नाते आणि त्यातून कथेची साधेपणाची मांडणी याचा विचार करून प्रतीकात्मक पोस्टर तयार केले होते ज्यात परिस्थितीने आपण रिंगणात अडकतो याची मांडणी करण्यासाठी त्यांनी रिंगण या नावाला एका गोलाकार भागात अडकवले होते. तसेच ‘कागर’ला गोष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न या नावाच्या डिझाईनवर केला आहे. हे बघून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बरेच सरप्राईज मिळणार आहेत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 11:30 am

Web Title: sairat fame rinku rajguru aka archi will seen next in kaagar movie
Next Stories
1 प्रियांका चोप्राला पाच मिनिटांसाठी पाच कोटी मिळाले तर गैर काय?
2 मुंबईत या ठिकाणी होणार ‘विरुष्का’च्या लग्नाचे रिसेप्शन
3 TOP 10 NEWS : रणवीरच्या ‘फॅन मुमेण्ट’पासून सापांशी खेळणाऱ्या अभिनेत्रीपर्यंत
Just Now!
X