News Flash

Video : “मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही”; सखी-सुव्रतचं मत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीवरून वाद सुरू झाला.

Video : “मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही”; सखी-सुव्रतचं मत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर यांसारख्या कलाकारांना अजूनही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. त्यातच दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही, मक्तेदारी असल्याचा खुलासा केला. याविषयी लोकप्रिय जोडी सखी गोखले व सुव्रत जोशी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत मांडलंय.

पाहा व्हिडीओ :

सखी ही प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी आणि सुव्रतची जोडी घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतही दोघांनी एकत्र काम केलं. मालिकेच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलल्याचं म्हटलं जातं. सुव्रतने ‘शिकारी’, ‘पार्टी’, ‘डोक्याला शॉट’, ‘मन फकिरा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 5:01 pm

Web Title: sakhi gokhale and suvrat joshi on nepotism in marathi industry ssv 92
Next Stories
1 घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट गमावले- तापसी पन्नू
2 स्विमिंग कॉश्च्यूममधील अनुष्काच्या हॉट फोटोवर विराटची प्रतिक्रिया; म्हणतो…
3 तारक मेहताचे नवे भाग कधी येणार; निर्माता आसित मोदी म्हणाले…
Just Now!
X