18 October 2018

News Flash

‘बिग बॉस’च्या घरात शिल्पा शिंदेने रचला इतिहास

शिल्पाच्या नावे 'शिल्पा विनिंग हार्ट' हे हॅशटॅग ट्रेण्ड होत होते

शिल्पा शिंदे

सध्या ‘बिग बॉस’च्या घरी सर्वात जास्त कोणत्या स्पर्धकाला पसंत केलं जात असेल तर ती शिल्पा शिंदे आहे. शिल्पा पहिल्या दिवसापासूनच योग्य पद्धतीने खेळत असल्याची भावना प्रेक्षकांची आहे. विकास गुप्ताने शिल्पाच्या अभिनयाचे कौतुक केले होते, तो क्षण प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिला. तसेच या दोघांमध्ये झालेली मैत्रीही अनेकांना पसंत पडली. पण तुम्हाला माहीत आहे का की, शिल्पाने बिग बॉसच्या घरात एक आगळावेगळा इतिहास रचला आहे. शिल्पा शिंदेचा सोशल मीडियावर चाहता वर्ग फार मोठा आहे. शिल्पाला मिळालेल्या ट्विटसने आतापर्यंत सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांचा विक्रम मोडला आहे. ‘बिग बॉस ११’ ही स्पर्धा जिंकण्यासाठी शिल्पा शिंदे ही तगडी स्पर्धक असल्याचे म्हटले जात आहे.

शिल्पा प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करताना दिसत आहे. एवढंच काय तर हिना खान आणि तिचे चाहते सलमान खानवर तो शिल्पाची अधिक बाजू घेत असतो असे आरोप करताना दिसतात. शिल्पा आणि हिनाचा वाद अजून काही दिवस तरी संपणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या चाहत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसते. पण त्यामुळे शिल्पाच्या प्रसिद्धीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. याचाच परिणाम सोशल मीडियावर दिसून आला. आतापर्यंत शिल्पाच्या नावे सर्वात जास्त ट्विट करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या बिग बॉसच्या कोणत्याच पर्वात एका स्पर्धकासाठी एवढे ट्विट करण्यात आले नव्हते.

शिल्पाच्या नावे ‘शिल्पा विनिंग हार्ट’ हे हॅशटॅग ट्रेण्ड होत होते. अनेकजण शिल्पाला ट्विटरच्या माध्यमातू सपोर्ट करताना दिसत आहेत. तर हिना खान आणि अर्शी खान यांच्या विरोधातही अनेकजण बोलत आहेत. शिल्पाबद्दल बोलताना एकदा विकास म्हणाला होता की, ती फार हुशार स्पर्धक आहे. ती फक्त लोकांचे मनोरंजनच करत नाहीये तर गोष्टी कशापद्धतीने पूर्ण कराव्या हेही तिला उत्तम माहीत आहे.

First Published on December 5, 2017 7:13 pm

Web Title: salman khan bigg boss 11 shilpa shinde fans twitter shilpa winning hearts vikas gupta first contestant to break record