News Flash

सलमानने ‘दबंग ३’मधील कोस्टार सुदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट

सलमानच्या दबंग ३मध्ये सुदीपने खलनायकाची भूमिका साकारली आहे

बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच अनेकांना मदत करत असतो. बऱ्याच वेळा तो महागड्या भेटवस्तू देताना देखील दिसतो. नुकताच सलमानने ‘दबंग ३’चा कोस्टार सुदीप किच्चाला एकदम खास अशी भेटवस्तू दिली आहे. सुदीपने सलमानने दिलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर करत सलमानचे आभार मानले आहेत.

सुदीपने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने शानदार असे लेदर जॅकेट परिधान केले आहे. या जॅकेटच्या पाठीमागे सलमानच्या डॉगचे चित्र आहे. सलमान त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.

‘मला हे जॅकेट घालताना सलमान सर म्हणाले की मी कधीच विचार केला नव्हता की मी या जॅकेटपासून दूर जाईन’ हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे. ‘सलमानने या जॅकेटवर त्याच्या आवडत्या पाळीव प्राण्याचे चित्र काढून घेतले होते. ज्या गोष्टींच्या आपण फार जवळ असतो त्या गोष्टींचे महत्त्व मला माहित आहे’ असे सुदीपने पुढे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

Spending time with the most loving, loyal and selfless species.

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

सलमनानकडे दोन नियपोलिटन मास्टिफ ब्रीड डॉग आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सलमनाने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 10:53 am

Web Title: salman khan gave most beautiful gift to sandeep kicha avb 95
Next Stories
1 काजोलने सांगितली नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण
2 बाहेरचं जगही कॉलेजनं दाखवलं
3 सेलिब्रिटी शेफचा गूढ मृत्यू; स्वयंपाकघरात आढळला मृतदेह
Just Now!
X